Posts

भारतीय लोकशाही... खरचं लोकांची आहे का?

 २०१९ च्या डिसेंबर महिन्यातील एक दिवस. सकाळचे दहा वाजले असतील. काही कामानिमित्त मित्रासोबत तहसील कार्यालयात जायचा योग ( की भोगण्यासाठी भोग?) आला. तिथं पोहचल्यावर लक्षात आलं की इतर दिवसांपेक्षा आज जरा जास्तच गर्दी आहे. सहज म्हणून एका काकांना विचारायला गेलो तर आम्ही बऱ्यापैकी शिकलेलो आहोत असं लक्षात आल्यामुळे त्यांनीच अगदी भाबड्या आवाजात एक प्रश्न विचारला, "काय रे पोरांनो, आम्हाला खरंच देशाबाहेर काढतील का रे?" ऐकताक्षणी लक्षात न आलेला प्रश्न समजून घेण्यासाठी सकाळीच वाचलेल्या बातमीने अगदी अचूक वेळी मनात येऊन मदत केली. ती बातमी होती, NRC आणि CAA ची......!  आणि मग लक्षात आलं इथे जमलेली गर्दी आपण याच देशाचे नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी आली होती. गर्दी मध्ये अगदी नुकताच मतदानाचा हक्क मिळालेल्या १८ वर्षाच्या युवकापासून ते आयुष्यभर या देशाच्या मातीची सेवा करून त्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात भर टाकणारे आणि आत्ता उतारवयात सरकार आपली काळजी घेईल या आशेत जगणारे ७० वर्षाचे 'चाचाजान' पण....! आणि मग प्रश्न पडला... जो प्रश्न प्रत्येक जिवंत अशा बुध्